पैसे ठेवा तयार! 'या' चार आयपीओंना GMP मध्ये तुफान प्रतिसाद, तुम्हालाही करू शकतात मालामाल?
या आठवड्यात एकूण 11 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यातील तीन आयपीओ तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील पहिला आयपीओ हा विशाल मेगा मार्ट लिमिटेड हा आहे. हा आयपीओ 11 ते 13 डिसेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला अेल. या आयपीओचा जीएमपी सध्या 24.36 टक्के आहे.
वन मोबक्विक सिस्टिम्स लिमिटेड हा आणखी एक आयपीओ आहे. हा आयपीओदेखील 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला असेल. या आयपीओचा शेअर सध्या 410 (46.95%) रुपयांवर आहे.
इन्व्हेंचरस नॉलेज सोल्यूशन्स लिमिटेड या कंपनीचा आयपीए 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ही कंपनी जीएमपीएवर 1679 (26.34%) रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे.
इंटरनॅशनल जेम्मोलॉजिकल इन्स्टिट्यू (इंडिया) लिमिटेड या कंपनीचा आपयीओ 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ही कंपनीदेखील जीएमपीमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतेय. जीएमपीमध्ये प्रत्येक शेअरचे मूल्य सध्या 517 (23.98%) रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)