Rules Change : क्रेडिट कार्ड, अटल पेंशन योजनेसह अनेक आर्थिक आजपासून नियमांत मोठे बदल; सविस्तर जाणून घ्या
Financial Rules: आजपासून नॅशनल पेन्शन स्कीमचं ई-नॉमिनेशन खूप सोपं झालं आहे. आता ई-नॉमिनेशन केल्यानंतर, तुमचा अर्ज नोडल ऑफिसरकडे ऑनलाइन पाठवला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppFinancial Rules Change : आज 1 ऑक्टोबर 2022, आजपासून देशात मोठे आर्थिक बदल झाले आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या-आमच्या खिशावर होणार आहे. आजपासून गॅल सिलेंडरच्या दरांपासून क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठीही अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. जाणून घेऊया सविस्तर
1 ऑक्टोबर 2022 पासून गॅस सिलेंडर व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Commercial Gas Cylinder) किंमत कमी करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 25.50 रुपयांनी, मुंबईत 32.50 रुपयांनी, कोलकात्यात 36.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 35.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1859.50 रुपयांना, मुंबईत 1811.50 रुपयांना, कोलकात्यात 1959.00 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 2009.50 रुपयांना गॅस सिलेंडर उपलब्ध आहे.
आजपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांच्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. RBI कार्ड टोकनायझेशन नियम आजपासून लागू झाला आहे. आता कार्डद्वारे पेमेंट केल्यावर, त्याचे तपशील प्रविष्ट करण्याऐवजी, तुम्हाला टोकन टाकावं लागणार आहे. यामुळं क्रेडिट कार्डनं पेमेंट करणं अधिक सुरक्षित होईल.
आजपासून नॅशनल पेन्शन स्कीमचं ई-नॉमिनेशनची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. आता ई-नामांकन केल्यानंतर, तुमचा अर्ज नोडल ऑफिसरकडे ऑनलाइन पाठवला जाईल. या विनंतीवर काही दिवसांत कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर अशा परिस्थितीत हा अर्ज स्वीकारला आहे, असं मानलं जाईल.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजपासून नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आता आयकर जमा करणारे लोक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून वृद्धापकाळात 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन घेऊ शकणार नाहीत.
आजपासून तुमच्या डिमॅट खात्यात लॉगइन करण्यासाठी तुम्हाला टू-स्टेप ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. प्रथम तुम्हाला बायोमेट्रिक डेटा सबमिट करावा लागेल. यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल. त्यानंतर तुम्ही सहज खात्यात लॉग इन करू शकता. युजर्सचं खातं सायबर फ्रॉडपासून सुरक्षित करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.