फक्त 'हे' पाच सूत्र पाळा, आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही!
चांगला पगार असूनदेखील काही लोकांकडे महिन्याच्या शेवटी पैसे शिल्लक राहात नाहीत. तर दुसरीकडे तुटपुंजा पगार असला तरी काही लोक बऱ्यापैकी पैशांची बचत करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपैशांच्या बाबतीत काही निर्णय घेतल्यास तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. खालील पाच मंत्रांचा अवलंब केल्यास तुमची पैशांची बचत होईल तसेच तुमची आर्थिक घडी विस्कटणार नाही.
अनेकजण कमवलेले पैसे लगेच खर्च करून टाकतात. पण पैसा हा माणसाचा सर्वांत जवळचा मित्र आहे. ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्या अडचणी चुटकीसरशी सुटतात. त्यामुळे पैशांची बचत करायला हवी.
तुम्ही बचत करत असलेल्या पैशांचे मूल्य काळानुसार कमी होत असते. त्यामुळेच तुम्ही तुमच्याजवळ असलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत. सध्या तुम्हाला चांगले रिटर्न्स देणारे गुंतवणुकीचे अनेक प्लॅन्स आहेत. त्याच अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक चालू करायला हवी.
तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह कायम राहण्यासाठी तुम्ही नोकरी, उद्योग करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकरदार असाल तर त्यात सातत्य असायला हवे. एखादी नोकरी लगेच सूडन देऊ नये किंवा ती लगेच बदलू नये.
प्रवास, पद, कर, इतर सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून नोकरी बदलण्याचा निर्णय घेतल्यास तुमची ओढाताण होणार नाही.
आजघडीला तुमच्या आजूबाजूल अनेक संस्था, बँका, आस्थापना आहेत, ज्या तुम्हाला लाखो रुपयांचे कर्ज द्यायला तयार असतात. मात्र कर्ज घेताना सारासार विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला या कर्जाची खरंच गरज आहे का? हे तपासायला हवं. तुमची गरज भागवण्यासाठी अन्य मार्ग असतील तर थेट कर्ज न काढता उपलब्ध असलेले मार्ग अवलंबायला हवेत.
वेळेवर आयटीआर भरणे ही एका प्रकारची जबाबदारी आहे. दिलेल्या तारखेच्या आत आयटीआर भरावा. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होतो.