फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 28 पैकी 14 दिवस बँका बंद; तुमच्या शहरातील बँक बंद असणार का?

फेब्रुवारी महिन्यांतील 28 दिवसांपैकी एकूण 14 दिवस बँका बंद आहेत. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फेब्रुवारी महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद असल्या तरी प्रत्येक राज्यात सुट्ट्यांचे दिवस कमी-अधिक होऊ शकतात. स्थानिक नियम, सण-उत्सव यानुसार प्रत्येक राज्यांतील सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो.

3 फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा आहे. त्यामुळे अगरतळा येथे बँका बंद असतील. 11 फेब्रुवारी रोजी थाई पूसाममुळे चेन्नईत बँका बंद असतील.
12 फेब्रुवारी रोजी श्री रविदास जयंती आहे. त्यामुळे शिमला येथे बँक बंद असतील. 15 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. या दिवशी लुई-नगाई-नीच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी बेलापूर, मुंबई, नागपूरमधील बँका बंद असतील.
20 फेब्रुवारी रोजी गुरूवार आहे या दिवशी स्टेटहुड डे आहे. त्यामुळे या दिवशी इटानगर येथे बँका बंद असतील.
26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ़, देहरादून, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगाना), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम या ठिकाणी बँका बंद असतील. 28 फेब्रुवारी रोजी गंगटोक येथे बँका बंद असतील.
2 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी शनिवार, रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
16 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. यासह 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी शनिवार आणि रविवारी बँकांना सुट्टी असेल.