FD Rate: SBI सह या बँकांनी वाढवले FD वरील व्याज दर; गुंतवणुकीआधी पाहा दर

Fixed Deposit Rates: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ केली आहे.

FD Rate: SBI सह या बँकांनी वाढवले FD वरील व्याज दर; गुंतवणुकीआधी पाहा दर

1/6
भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्टमध्ये सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. त्याचा परिणाम सर्व बँकांच्या मुदत ठेवींच्या (FD) व्याज दरांवर दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात अनेक वेळा वाढ केली आहे. जर तुम्ही देखील बँक FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या बँकांच्या व्याज दराबाबत जाणून घ्या...
2/6
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया 13 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या एफडीच्या दरात 15 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. बँकेने सात दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी 3.40 टक्क्यांपासून ते 6.15 टक्क्यांपर्यंत व्याज दर लागू केला आहे.
3/6
इंडसइंड बँकेने (IndusInd Bank) 12 ऑगस्ट 2022 रोजी एफडी व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या डिपॉझिटवर सामान्य नागरिकांना 3.50 टक्क्यांपासून 6.25 टक्क्यापर्यंत व्याज दराची ऑफर केली आहे.
4/6
अॅक्सिस बँकने दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर 2.50 टक्के ते 5.75 टक्क्यापर्यंत व्याज दर जाहीर केला आहे.
5/6
कॅनरा बँकने दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या सात दिवस ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 2.90 टक्क्यांपासून ते 5.75 टक्के इतका व्याज दर देणार असल्याचे जाहीर केले आहे.
6/6
Yes Bank ने दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर 3.25 टक्के ते 6.75 टक्के व्याज दर जाहीर केला आहे. हा व्याज दर सात दिवसांपासून ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज दराचा फायदा असणार आहे.
Sponsored Links by Taboola