EPFO कडून 7.7 कोटी सदस्यांना सूचना, मोफत सेवांसाठी पैसे देऊ नका, तिऱ्हाईत कंपन्या किंवा एजंटपासून सावधानतेचा इशारा
EPFO : ईपीएफओच्या यूएएन मेंबर पोर्टल आणि यूएएन पासबुक पोर्टलवरुन मोफत सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी पैसे देऊ नका, असं आवाहन ईपीएफओनं केलं आहे.
Continues below advertisement
ईपीएफओ
Continues below advertisement
1/6
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सर्व भागधारकांना अधिक जलद, पारदर्शी आणि अनुकूल सेवा देण्यासाठी अनेक सुधारणा राबवल्या आहेत. ईपीएफओनं सदस्यांसाठी एक आवाहन केलं आहे त्यानुसार अनेक सायबर कॅफे ऑपरेटर/फिनटेक कंपन्या, अधिकृतपणे मोफत असलेल्या सेवांसाठी ईपीएफओ सदस्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
2/6
ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलचा वापर कोणत्याही सदस्याला मोफत घरबसल्या करता येऊ शकतो त्यासाठी अनेक प्रकरणांमध्ये ऑपरेटर पैसे आकारत आहेत. ईपीएफओशी संबंधित सेवांसाठी तिऱ्हाईत कंपन्या किंवा एजंटना भेट देण्यासंदर्भात संबंधिताना सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे, असं ईपीएफओनं सांगितलं आहे.
3/6
तिऱ्हाईत कंपन्या किंवा ऑपरेटरशी संपर्क साधताना भागधारकांचा आर्थिक डेटा त्यांच्यासमोर उघड होऊ शकतो. या बाह्य संस्था ईपीएफओ अधिकृत नाहीत. त्या अनावश्यक शुल्क आकारतात किंवा सदस्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेशी तडजोड करू शकतात याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचं ईपीएफओनं म्हटलंय.
4/6
ईपीएफओकडे एक मजबूत तक्रार देखरेख आणि निवारण प्रणाली आहे. त्यावर सदस्यांच्या तक्रारी CPGRAMS किंवा EPFiGMS पोर्टलवर नोंदवल्या जातात आणि कालबद्ध पद्धतीने त्यांचे निराकरण होईपर्यंत निरीक्षण केले जाते. सर्व सदस्यांना, नियोक्त्यांना आणि पेन्शनधारकांना ईपीएफओ पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सेवांचा वापर करण्याचा सल्ला ईपीएफओने दिला आहे.
5/6
दावा दाखल करणे, हस्तांतरण, केवायसी अपडेट करणे आणि तक्रार प्रक्रिया यासह सर्व ईपीएफओ सेवा पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि सदस्यांनी सहजपणे उपलब्ध ऑनलाइन सेवांसाठी निराळे एजंट किंवा सायबर कॅफेला कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहन केले आहे.
Continues below advertisement
6/6
अधिक माहितीसाठी सदस्यांनी www.epfindia.gov.in या ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या प्रादेशिक मदत कक्ष /जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. जागतिक दर्जाच्या, तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक सुरक्षा सेवांसह भारतातील कामगारांना सक्षम करण्यासाठी ईपीएफओ वचनबद्ध आहे.
Published at : 16 Jun 2025 11:57 PM (IST)