EPFO : पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम एका मिस्ड कॉलवर समजणार, कोणत्या अटींची पूर्तता आवश्यक?

EPFO : अनेकदा पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ईपीएफओच्या पासबूकच्या वेबसाईटवर लॉगीन करावं लागतं. काही तांत्रिक अडचण असल्यास वाट पाहावी लागते.

Continues below advertisement

ईपीएफओ

Continues below advertisement
1/6
भारतात संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम ईपीएफच्या रुपात निवृत्तीच्या काळातील खर्चासाठी बचत म्हणून ईपीएफओच्या खात्यात जमा केली जाते.
2/6
कर्मचारी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीकडून देखील ठराविक रक्कम नियमितपणे ईपीएफ आणि पेन्शन खात्यात जमा केली जाते.
3/6
अनेकदा आपल्या पीएफ खात्यात आणि पेन्शन खात्यात किती रक्कम जमा झाली याची उत्सुकता कर्मचाऱ्यांना असते. पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे यूएएन पासबुक या वेबसाईटवर लॉगीन करुन शिल्लक तपासणे.
4/6
याशिवाय पीएफ खात्यातील रक्कम मिस्ड कॉलवर किंवा एसएमसद्वारे देखील समजू शकते. यासाठी काही अटींची पूर्तता करणं आवश्यक असतं.
5/6
पहिली अट म्हणजे तुमचा यूएएन क्रमांक सक्रीय असणं आवश्यक आहे. तो यूएएनच्या पोर्टलवरुन UAN सक्रीय करता येईल. तुमचा मोबाईल क्रमांक यूएएनला लिंक असावा. ही पूर्तता केलेली असल्यास तुम्हाला पीएफ शिल्लक मोबाईलवरुन समजेल. यासोबत केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे.
Continues below advertisement
6/6
या अटी पूर्ण असल्यास 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल करुन शिल्लक रक्कम तपासता येते. दोन रिंग नंतर फोन कट होतो आणि फोनवर शिल्लक रकमेचा मेसेज येतो. EPFOHO UAN हा मेसेज 7738299899 या खात्यावर मेसेज केल्यास एसएमसद्वारे शिल्लक रकमेची माहिती मिळते.
Sponsored Links by Taboola