EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना यांच्याकडील पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंदर्भात मोठे बदल करण्यात येणार आहेत.

ईपीएफओ

1/5
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं खातेदारांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. पीएफची रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. पीएफची रक्कम ऑटो सेटलमेंट करण्यासाठीची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाख रुपये करण्यात येईल.
2/5
पीएफ खात्यातील रक्कम यूपीआय आणि एटीएमद्वारे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याचा फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल.
3/5
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी गेल्या आठवड्यात श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावांना मान्यता दिल्याची माहिती आहे. यासंदर्भातील बातमी फायनान्शिअल एक्स्प्रेसनं दिली आहे. आता हा निर्णय सेंट्रल बोड्र ऑफ ट्रस्टीजकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी यांनी लोकसभेत सध्या ऑटोक्लेमची संख्या 60 टक्के असल्याचं म्हटलंय.
4/5
ईपीएफओनं एप्रिल 2020 मध्ये करोना काळात ऑटो सेटलमेंट सुविधा सुरु केली होती. त्यानंतर ती सुविधा लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठी वाढवण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला ही रक्कम मर्यादा 50 हजार रुपये होती ती नंतर 1 लाख रुपये करण्यात आली. आता ती 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल.
5/5
याशिवाय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सूचनेला मान्यता देत पीएफची रक्कम यूपीआयद्वारे काढण्यास मंजुरी दिली आहे.
Sponsored Links by Taboola