EPF Rate: ईपीएफ खातेधारकांना होळीपूर्वी गुड न्यूज मिळणार, पीएफ रकमेवरील व्याजदराबाबत मोठा निर्णय होणार

EPF Rate Hike: ईपीएफओकडून चालू आर्थिक वर्षात खातेधारकांना व्याज देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशात ईपीएफओचे 7 कोटी खातेदार आहेत.

ईपीएफओ

1/5
होळीपूर्वी 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. एम्पलॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या केंद्रीय ट्रस्टीजची बैठक 28 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ईपीएफवर 8.25 टक्के व्याज देण्यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देखील 8.25 टक्के व्याज दिलं होतं. .
2/5
एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या गुंतवणूक वित्तीय आणि लेखापरिक्षण समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामध्ये ईपीएफओचं उत्पन्न आणि खर्च यावर चर्चा करेल. ईपीएफवर किती व्याज दिलं जाणार याबाबत केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखलील सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत निर्णय होईल. यानंतर व्याज दराचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवला जाईल.
3/5
गेल्या वर्षी ईपीएफ खातेधारकांना 2023-24 साठी 8.25 टक्के, 2022-23 मध्ये 8.15 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.10 टक्के व्याज मिळालं होतं. चालू आर्थिक वर्षात ईपीएफओला त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला आहे.
4/5
ईपीएफओनं क्लेम सेटलमेंटमध्ये देखील इतिहास केला आहे. चालू आर्थिक वर्षात 5 कोटी क्लेम सेटल केले आहेत.
5/5
सध्या ईपीएफओचे 7 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. संघटित क्षेत्र विशेषत: खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांकडून ईपीएफओमध्ये रक्कम जमा केली जाते. पीएफमधील रक्कम नोकरी सुटणे, घर बांधणे, लग्न, मुलांचं शिक्षण या का कारणासाठी काढता येते.
Sponsored Links by Taboola