EPFO : सात कोटींहून अधिक नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO चा व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय, व्याज दर किती ठरला?

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं 2024-25 साठी व्याज दर जाहीर केला आहे. यामुळं नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

ईपीएफओ

1/5
आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफओनं व्याज दर निश्चित केला आहे. या आर्थिक वर्षासाठी व्याज दर 8.25 टक्के असेल. 2023-24 मध्ये देखील हाच व्याज दर होता. या निर्णयाचा 7 कोटी 40 लाख सदस्यांना फायदा होणार आहे.
2/5
सुरुवातीला ईपीएफओ व्याज दर जास्त देणार अशा चर्चा सुरु होत्या, काल पुन्हा व्याज दर घटवला जाणार अशा चर्चा सुरु झालेल्या, मात्र आहेत तेच व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक सुरु आहे.
3/5
गेल्या वर्षी ईपीएफओनं व्याज दर 0.10 टक्क्यानं वाढवला होता. जो 2022-23 मध्ये 8.15 टक्के होता. तर, 2021-22 मध्ये हा व्याज दर 8.10 टके होता. 2020-21 मध्ये व्याज दर 8.5 होता.
4/5
ईपीएफओकडून दरवर्षी खातेदारांसाठी व्याजदराची घोषणा केली जाते. मात्र,त्यासाठी वित्त मंत्रालयाची मंजुरी घेतली जाते. आता 2024-25 साठी व्याज दर जाहीर झाले आहेत. याला वित्त मंत्रालयाकडून मंजुरी दिली जाईल. सरकारनं मंजुरी दिल्यानंतर खातेदारांच्या खात्यात व्याज जमा होईल.
5/5
ईपीएफओनं व्याज दर कायम ठेवल्यानं या निर्णयाचा लाभ 7 कोटी 40 लाख खातेदारांना होईल. ईपीएफओनं जानेवारीपासून काही बदल लागू केले आहेत. त्यामध्ये पेन्शन संदर्भातील स्पष्टीकरण, संयुक्त घोषणापत्र प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. इपीएफओनं या वर्षात 5 कोटींपेक्षा अधिक क्लेम सेटल केले आहेत.
Sponsored Links by Taboola