डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मैत्री केली पण महागात पडली, एलन मस्कवर लोक नाराज, तब्बल 9 लाख कोटी बुडाले
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री उद्योजक एलन मस्क यांना महागात पडल्याचं चित्र आहे. एलन मस्क यांचे जवळपास 9 लाख कोटी बुडाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प, एलन मस्क
1/5
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री उद्योजक एलन मस्क यांना महागात पडत असल्याचं चित्र आहे. एलन मस्क यांचं गेल्या काही दिवसात 9 लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
2/5
एलन मस्क हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रमुख सल्लागार आणि सरकारी दक्षता विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना अमेरिकेनं नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघातून बाहेर पडावं असं मस्क यांनी म्हटलं. अनेकांना वाटतंय की एलन मस्क यांना डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री फायदेशीर ठरतेय. मात्र, प्रत्यक्षात एलन मस्क यांना गेल्या 2 महिन्यात 9 लाख कोटी रुपयांचा फटका बसला.
3/5
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जगातील इतर देशांना टॅरिफची धमकी देत आहेत. यामुळं यूरोपियन देश त्यांच्यापासून दूर गेलेत. अमेरिकेवरील राग देखील वाढला आहे. या नाराजीचा फटका एलन मस्कला देखील बसला आहे.
4/5
लोक त्यांची नाराजी एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची कार न खरेदी करुन दाखवून देत आहेत. टेस्लाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जर्मनीत 76 टक्के विक्री कमी झाली,फ्रान्समध्ये 45 टक्के, इटलीमध्ये 55 टक्के, नेदरलँडसमध्ये 24 टक्के, स्वीडनमध्ये 42 टक्के, स्पेनमध्ये 10 टक्के कारविक्री घटली आहे.
5/5
ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये देखील टेस्लाच्या कारची विक्री होत नाही. ऑस्ट्रेलियात 66 टक्के तर चीनमध्ये 49 टक्के घसरण झाली आहे.टेस्लाचे शेअर 30 टक्क्यांनी घटला आहे. गेल्या एक महिन्यात टेस्लाचा शेअर 25 टक्क्यांनी घटला आहे. गुगल आणि एन विडीया पेक्षा अधिक घसरण टेस्लाच्या शेअरमध्ये जाली आहे.ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या रिपोर्टनुसार 103 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 लाख कोटी रुपयांचा तोटा एलन मस्कला झाला आहे. एलन मस्कचं नेटवर्थ 330 अब्ज डॉलर्स इतकं आहे.
Published at : 10 Mar 2025 12:16 PM (IST)