Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुबईचं सोनं भारताच्या सोन्यापेक्षा स्वस्त
सोनं खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सध्या भारतात दिवसेंदिवस सोन्या चांदीचे दर (Gold Price) वाढत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. दरम्यान, तुम्हाला माहित आहे का? की भारताच्या सोन्यापेक्षा दुबईचं सोनं (Dubai Gold Price ) स्वस्त आहे.
तुम्ही दुबईवरुन एकावेळी तुमच्यासोबत किती सोनं आणू शकता याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
दुबईला 'सोन्याचे शहर' असंही म्हटलं जातं. दुबईला भेट देणारे भारतातील लोक सोन्याची खरेदी करतात. कारण लोकांचा असा विश्वास आहे की तिथे सोने स्वस्त आहे.
भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोने किती स्वस्त आहे आणि तेथून तुम्ही किती सोने घरी आणू शकता हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवाशाला 50000 रुपये किमतीचे 20 ग्रॅमपर्यंतचे दागिने तुम्ही शुल्कमुक्त आणू शकता.
आहे. भारताच्या तुलनेत दुबईत सोने स्वस्त आहे. हे आयात शुल्कामुळे आहे. भारतात जिथे सोने आयात करण्यासाठी शुल्क भरावे लागते. त्याचबरोबर दुबईत सोन्यावर आयात शुल्क नाही.
जेव्हा जेव्हा कोणी नातेवाईक किंवा मित्र दुबईला जातात तेव्हा लोक तिथून सोने नक्कीच मागवतात. मात्र, दुबईतून किती सोने आणता येईल याबाबत काही नियम आहेत.
दुबईमध्ये सोन्याची किंमत दिरहम 263.25 प्रति ग्रॅम आहे. जी भारतीय चलनात 5969 रुपये आहे. त्याच वेळी, भारतात एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,670 रुपये आहे.