'मोदीजी मला खूश करा नाहीतर..' डोनाल्ड ट्रम्प यांची नरेंद्र मोदींना पुन्हा धमकी; टॅरिफ लादण्यावर नेमकं काय म्हणाले?

Donald Trump Warns India Over Potential Higher Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा इशारा दिला. कर आणखी वाढवता येऊ शकतात, असा इशारा देत नाखूष असल्याचं सांगितलं.

Continues below advertisement

Donald Trump Warns India Over Potential Higher Tariffs

Continues below advertisement
1/10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफच्या मुद्यावरून ताशेरे ओढले आहेत. सध्या ट्रम्प व्हेनेझुएलावरील कारवाईमुळे चर्चेत आहेत, याच दरम्यान त्यांनी भारताबाबतही महत्त्वाचे विधान केले.
2/10
ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला की, जर वाटलं तर, कर आणखी वाढवता येऊ शकतात. त्यांनी आपल्या विधानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचा देखील उल्लेख केला आहे.
3/10
ट्रम्प यांनी याआधी भारतासह अनेक देशांवर कर लादले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, भारतावर 50 टक्के कर लादण्यात आला आहे.
4/10
एएनआयच्या वृत्तानुसार, भारतावर कर लादण्याबाबत ट्रम्प म्हणाले, "या मुद्द्यावर मला खरोखरंच त्यांनी समाधान करायला हवे होते. पंतप्रधान मोदींजी खूप चांगले माणूस आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहेत".
5/10
"त्यांना ठाऊक होते की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे मी नाखूष आहे", असं ट्रम्प म्हणाले.
Continues below advertisement
6/10
"मला समाधानी करणे महत्त्वाचे होते. जर त्यांनी रशियन तेल खरेदी करणे सुरू ठेवले, तर आम्ही त्यांच्यावर लवकरच कर वाढवू शकतो", असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.
7/10
ऑगस्ट 2025मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला होता. यामागचं कारण म्हणजे, भारताचे रशियासोबतचे तेल व्यापार होते. ट्रम्प यांनी याबाबत अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार बराच काळ रखडला.
8/10
डोनाल्ड ट्रम्प इच्छित होते की, भारत अमेरिकेसाठी संपूर्ण बाजारपेठ खुली करेल. दुग्धव्यवसाय तसेच कृषी क्षेत्रातही प्रवेश देईल. परंतु, भारताने याबाबतीत आपला ठाम निर्णय घेतला होता.
9/10
भारत आणि रशियाचे वर्षानुवर्षे चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार देखील होतो. या कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प संतापले असल्याची माहिती आहे. त्यांच्या ताज्या विधानातही त्यांनी याचा उल्लेख केला आहे.
10/10
ट्रम्प सध्या व्हेनेझुएलातील त्यांच्या कारवाईमुळे चर्चेत आहेत. अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली आहे. आता त्यांच्यावर खटला चालवला जात आहे.
Sponsored Links by Taboola