Pan Card Update Rules: नाव अपडेट केल्यानंतर किती दिवसांनी पॅन कार्ड घरी येतं?
भारतात राहण्यासाठी लोकांकडे काही कागदपत्रं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रे दररोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी आवश्यक असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा, तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकणार नाहीत.
यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होतो.
यापैकी काही कागदपत्रं आहेत, ज्याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामं रखडतील. त्यापैकी पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत आवश्यक असतं.
बँकेच्या कामांसाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुमचे आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाहीत.
अनेक वेळा पॅनकार्डमध्ये लोकांची नावं चुकीच्या पद्धतीनं टाकली जातात. कधी स्पेलिंग मिस्टेक किंवा कधी तारखांमध्ये गडबड होते. त्यामुळे हे आधार कार्डसारख्या इतर कागदपत्रांशी जुळत नाही. तुमच्याबाबतीतही असं झालं असेल, तर तुम्हालाही पॅन कार्ड अपडेट करुन घ्यावं लागेल.
अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, पॅनकार्डमध्ये नाव अपडेट केल्यानंतर पॅन कार्ड डिलिव्हर व्हायला किती वेळ लागतो?
नवं पॅन कार्ड मिळण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढाच वेळ पॅनकार्ड अपडेट केल्यानंतर ते घरी येण्यासाठी लागतो. 15 ते 20 दिवसांत नाव अपडेट केल्यानंतर, पॅन कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचवलं जातं.