क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे का? मग बातमी आपल्यासाठीच
सध्या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या आभासी चलनात गुंतवणूक करण्याआधी तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
cryptocurrency (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7
Cryptocurrency Hacking : गुंतवणुकीसाठी अनेकजण क्रिप्टोकरन्सीचा पर्याय निवडतात. पण या क्रिप्टोकरन्सीच्या चोरीची तसेच हँकिंगची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. चालू वर्षात जानेवरी ते जून या सहा महिन्यांत क्रिक्टोकरन्सच्या चोरीचे प्रमाण थेट दुप्पट झाले आहे.
2/7
ब्लॉकचैन रिसर्चर टीआरएम लॅब्सने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. टीआरएम लॅब्सने दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या हॅकर्सने 2024 मध्ये जून महिन्यापर्यंत 1.38 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक क्रिप्टोकरन्सीची चोरी केली आहे.
3/7
गेल्या वर्षाच्या सहा महिन्यांची तुलना करायची झाल्यास हे प्रमाण थेट दुप्पट आहे. 2023 मध्ये जानेवारी ते जून या 6 महीन्यांत 657 दशलक्ष डॉलर्सची चोरी करण्यात आली होती.
4/7
आजकाल क्रिप्टोकरन्सीच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. याची दोन प्रमुख कारणे आहे. हॅकर्सकडून केले जाणारे अटॅक्स आणि क्रिप्टोकरन्सीचे वाढत जाणारे मूल्य या दोन प्रमुख कारणांमुळे क्रिप्टोकरन्सची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
5/7
गेल्या वर्षभराचा अभ्यास करायचा झाल्यास या काळात क्रिप्टोकरन्सचे मूल्य वाढले आहे. या वर्षी सर्वच प्रमुख क्रिप्टोकरन्सींचे मूल्य ऑल टाईम हाय झाले आहे. अन्य क्रिप्टोकरन्सीचेही मूल्य वाढले आहे.
6/7
2022 सालाच्या उत्तरार्धात बिटकॉईनचे मूल्य घसरले होते. नंतर 2024 सालाच्या सुरुवातीला बिटकॉईनच्या मूल्यात चांगली तेजी आलेली आहे. सध्या बिटकॉईनचे मूल्य हे 73,800 डॉलर्स प्रति यूनिटच्याही पुढे गेले आहे.
7/7
या वर्षी सर्वांत मोठी चोरी ही जापानी क्रिप्टो एक्स्चेंज डीएनएम बिटकॉइन येथे झाली. या चोरीदरम्यान 308 दशलक्ष डॉलरचे बिटकॉइन चोरी करण्यात आले. जगातील क्रिप्टोकरन्सीची ही सर्वांत मोठी चोरी आहे.
Published at : 11 Jul 2024 11:01 AM (IST)