Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताना विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण चुकीचा वापर तुमच्या क्रेडिट हेल्थसाठी हानिकारक ठरू शकतं.

Continues below advertisement

Credit Card

Continues below advertisement
1/12
क्रेडिट कार्ड आजच्या जीवनात एक आर्थिक साधन बनलं आहे. रेस्टॉरंट बिल, ऑनलाइन शॉपिंग, आणि ट्रॅव्हल बुकिंगमध्ये याचा वापर केला जातो.
2/12
पण तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर नेहमी फायदेशीर ठरत नाही.
3/12
काही वेळा कार्ड वापरणे तुमच्या क्रेडिट हेल्थसाठी हानिकारक ठरू शकतं.
4/12
जर तुमची क्रेडिट लिमिट जवळ आली असेल तर नवीन व्यवहार टाळा. कारण लिमिटच्या जवळ खर्च केल्याने CIBIL स्कोर कमी होऊ शकतो.
5/12
क्रेडिट कार्डद्वारे कॅश विड्रॉल केल्यास बँक अतिरिक्त शुल्क आणि जास्त व्याज आकारते. म्हणून जर अतिआवश्यक असेल तरच याचा वापर करा.
Continues below advertisement
6/12
दर महिन्याला केवळ मिनिमम पेमेंट केल्याने उर्वरित रक्कमेवर व्याज लागते आणि हळूहळू कर्ज वाढत जातं. त्यामुळे शक्यतो संपूर्ण बिल वेळेत भरा.
7/12
महाग वस्तू फक्त क्रेडिटवर खरेदी करू नका. यासाठी आधीच पेमेंट प्लॅन ठरवा, जेणेकरून पुढील बिल भरण्याचा ताण कमी राहील.
8/12
संशयास्पद HTTPS नसलेल्या वेबसाइटवर कार्ड डिटेल्स देऊ नका कारण अशा साइट्सवर डेटा चोरी किंवा फसवणुकीचा धोका असू शकतो.
9/12
ड्यू डेट नंतर बिल भरण्याची सवय क्रेडिट स्कोर खराब करू शकते. लेट पेमेंटमुळे बँक दंड आकारते आणि व्याज वाढते.
10/12
जर आधीच कर्ज जास्त असेल, तर नवीन खर्च टाळा. शक्य असल्यास दैनंदिन व्यवहारांसाठी डेबिट कार्ड किंवा यूपीआय वापरा.
11/12
जर तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन पाळल्यास तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहू शकतो.
12/12
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola