आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं! भारतासह अन्य देशांना चीनचा निर्वाणीचा इशारा

अमेरिकेशी कोणताही करार कराल तर याद राखा, तुमच्यावरही तीच वेळ येईल चीनचा निर्वाणीचा इशारा

Xi Jinping

1/7
अमेरिकेच्या आयातशुल्काच्या धोरणाचा परिणाम म्हणून अमेरिकेबरोबर तातडीने व्यापारी करार करण्याचे पाऊल उचलणाऱ्या देशांबाबतही उपाय केले जातील,' असा धमकीवजा इशात चीनने दिला आहे.
2/7
अमेरिकेबरोबर कर सवलत मिळावी, यासाठी भारतासह अनेक देशांची अमेरिकेबरोबर सध्या बोलणी सुरू आहेत. अशा करारांना चीनचा विरोध असेल, असे चीनने स्पष्टपणे म्हटले आहे.
3/7
चीनचे व्यापारी संबंध असलेल्या देशांना अमेरिकेबरोबर करार करण्यापासून रोखण्यासाठी चीनने स्वतःहून पाऊल उचलले आहे.
4/7
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी अमेरिकेबरोबरील संबंधित देशांच्या करारांना चीनचा विरोध असेल, असे म्हटले आहे.
5/7
प्रवक्ते म्हणाले, 'अशी परिस्थिती आली, तर चीन ती स्वीकारणार नाही आणि त्यावर निर्धाराने प्रत्युत्तर दिले जाईल.
6/7
तात्पुरत्या फायद्यासाठी इतरांचे व्यापारी हितसंबंध दूर सारणे म्हणजे वाघाशी त्याच्या कातडीसाठीच हुज्जत घालण्यासारखे होईल. असे केले, तर केवळ उलट उत्तर मिळेल.' चीनच्या हिताला डावलून अमेरिकेशी करार करणे चीन खपवून घेणार नाही, चीनला तिचे हितसंबंध आणि हक्कांचे संरक्षण करण्याचा अधिकार आणि क्षमता आहे, असा सज्जड दमच वाणिज्य मंत्रालयाने दिला आहे.
7/7
चीनच्या या धोरणामुळे अमेरिका-चीनच्या करयुद्धात आता इतर देशही भरडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sponsored Links by Taboola