Investment : मुलांसाठी गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या!
मुलांसाठी उपयुक्त असे काही महत्त्वाचे गुंतवणूक पर्याय जाणून घेऊया..
Continues below advertisement
गुंतवणूक पर्याय
Continues below advertisement
1/9
आजच्या महागाईच्या जगात आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचं झालं आहे. शिक्षण, करिअर, लग्न यासाठी मोठा खर्च येतो. लवकर गुंतवणूक सुरू केल्यास तुमचं अपत्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकतं.
2/9
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही योजना फक्त मुलींसाठी आहे. सरकारकडून चालवली जाणारी ही स्कीम दीर्घकालीन आणि सुरक्षित आहे.
3/9
या योजनेत व्याजदर सुमारे 8% (सरकार दर तिमाहीने बदलते) मिळतो. त्याचप्रमाणे IT अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत वजावट देखील क्लेम करता येते. या योजनेचा लॉक-इन कालावधी म्हणजेच मुलीच्या 21 व्या वर्षापर्यंत ठेवता येतो. यासाठी खाते पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही राष्ट्रीय बँकेत उघडता येते. जर 5 वर्षांच्या वयात सुरुवात केली, तर 14 वर्षांपर्यंत दरवर्षी गुंतवणूक करून चांगला निधी तयार होतो.
4/9
सार्वजनिक भविष्य निधी (PPF) : PPF ही एक सरकारी बॅकअप असलेली सुरक्षित गुंतवणूक योजना आहे.पालक आपल्या नावावर खाते उघडून, नंतर मुलासाठी ते ट्रान्सफर करू शकतात.
5/9
म्युच्युअल फंड्स (SIP द्वारे) : म्युच्युअल फंड्स हे आजकाल जास्त परतावा मिळवण्यासाठी एक स्मार्ट पर्याय आहे.जर दरमहा ₹1000 गुंतवणूक केली तर 15 वर्षांनंतर एक चांगला निधी तयार होतो.
Continues below advertisement
6/9
ULIP – युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन हे एकत्रितपणे विमा आणि गुंतवणूक देणारी योजना आहे. यात चाइल्ड प्लॅन ऑप्शन वेगळा मिळतो
7/9
चाइल्ड फिक्स्ड डिपॉझिट : काही बँका बाल फिक्स्ड डिपॉझिट योजना देतात ज्या सुरक्षित आणि स्थिर असतात.
8/9
डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ETF: मुलीच्या लग्नासाठी किंवा भविष्याच्या खर्चासाठी सोनं ही एक चांगली गुंतवणूक असते.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 08 Jul 2025 09:50 AM (IST)