Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेनं करा चार धाम यात्रा, किती करावा लागणार खर्च?
रेल्वेन तुम्ही विविध ठिकाणी प्रवास करु शकता. देशातील महत्वाच्या धार्मिक स्थलांना देखील भेट देऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता रेल्वेने देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळांसाठी एक पॅकेज आणलं आहे.
आता तुम्हाला भारतीय रेल्वेन चार धाम यात्रा करता येणार आहे. याद्वारे तुम्ही अनेक स्थळांना भेटी देऊ शकता.
चार धाम यात्रेच पॅकेज हे दिल्लीतून भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने सुरु केलं आहे. यामध्ये तुम्हाला ऋषिकेशला जाण्याची संधी मिळते. तिथून जोशीमठहून केदारनाथ, बद्रीनाथलाही जाता येतं.
ऋषिकेशहून परत आल्यानंतर पुरी, रामेश्वरम, पुणे, नाशिक, द्वारका आणि त्यानंतर रेल्वे परत दिल्लीला येते.
हे संपूर्ण पॅकेज 17 दिवस आणि 16 रात्रीचे आहे. यामध्ये तुम्हाला एसी 1 कूप, एसी 1 टायर, एसी 2 टायर आणि एसी 3 टायरमध्ये प्रवास करावा लागणार आहे.
दरम्यान, या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे.
तुमच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये मॅनेजर असणार आहे.
या चार धाम यात्रेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 83,970 ते 1.79 लाख रुपये खर्च करावे लागतील.
28 जून 2024 पासून तुमची ही चार धाम यात्रा सुरु होणार आहे.