PPF Interest Rates: पीपीएफवर व्याज वाढणार? जाणून द्या केंद्र सरकार का घेणार हा निर्णय
पीपीएफ गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकार लवकरच पीपीएफचे व्याजदर वाढवू शकते. सध्या, PPF वर वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.
सरकारी रोख्यांवर सध्याचा व्याजदर 7.3 टक्के आहे. हा व्याज दर पीपीएफपेक्षा जास्त आहे.
जानेवारी 2022 मध्ये सिक्युरिटीजवरील व्याजदर 6.5 टक्के आणि जूनमध्ये 7.6 टक्के होता.
सप्टेंबरपर्यंत सलग नऊ तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
या महिन्यात होणाऱ्या बैठकीत त्यांचे व्याजदर वाढणे जवळपास निश्चित असल्याचे समजले जाते.
सरकारी रोख्यांचे व्याजदर आणि पीपीएफ यांचा थेट संबंध आहे. PPF वर सिक्युरिटीजच्या सरासरी व्याजदरापेक्षा 1 टक्के जास्त व्याज देण्याची तरतूद आहे.
सरकारी रोख्यांचे बाजारातील उत्पन्न जेवढे जास्त असेल, पीपीएफसारख्या लहान बचत योजनांचे व्याजदरही त्याच प्रमाणात वाढतील.
PPF सोबतच, गुंतवणूकदारांना इतर लहान बचत योजनांचेही व्याजदर वाढवले जाऊ शकतात.
यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र (KVP), फिक्स्ड डिपॉझिट, PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेमधीलही व्याजदर वाढवले जाऊ शकतात.