Budget 2020 | आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आहेत मोरारजी देसाई
त्यानंतर एक मे 1997 पासून 19 मार्च 1998 पर्यंत ते तत्कालीन पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचं सरकार असताना अर्थमंत्री होते. यादरम्यान त्यांनी एकदाच संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी, 1896 रोजी गुजरात येथील वलसाड जिल्ह्यातील गावात झाला होता. देशात पहिल्यांदा 1977मधील काँग्रेस सरकारच्या काळात मोरारजी देसाई पंतप्रधान बनले होते. ते 24 मार्च, 1977 पासून 28 जुलै, 1979 पर्यंत देशाटे पंतप्रधान होते.
मोरारजी देसाई यांनी केंद्र सरकारचे 10 अर्थसंकल्प संसदेत सादर केले. ज्यांपैकी आठ पूर्ण अर्थसंकल्प तर दोन अंतर्गत अर्थसंकल्प आहेत. वर्ष 1964 आणि 1968 मध्ये मोरारजी देसाईंनी आपल्या जन्मदिनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता.
मोरारजी देसाई पहिल्यांदा 13 मार्च, 1958 ते 29 ऑगस्ट, 1963 पर्यंत देशाचे अर्थमंत्री होते. त्यानंतर मार्च 1967 ते जुलै 1969 पर्यंत पुन्हा त्यांनी अर्थमंत्री पहाची जबाबदारी स्विकारली.
भारताचे चौथे पंतप्रधान बनण्याआधी मोरारजी देसाई यांनी यांनी अर्थमंत्री म्हणून 10 अर्थसंकल्प सादर केले होते. त्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी एकूण 8 वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे, एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशात आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.
सर्वाधिक वेळा म्हणजेच, चार वेळा अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांनीदेखील एकूण 8 वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. पी. चिदंबरम पहिल्यांदा एक जून 1996 ते 21 एप्रिल 1997 पर्यंत अर्थमंत्री होते.
त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना पी. चिदंबरम 22 मे, 2004 पासून 30 नोव्हेंबर 2008 पर्यंत अर्थमंत्री होते. पी. चिदंबरम चौथ्यांदा 31 जुलै, 2012 ते 26 मे, 2014 पर्यंत अर्थमंत्री होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -