सोन्या चांदीच्या दरात घसरण, कोणत्या शहरात किती दर?

सोन्याच्या दराबाबत दिलासादायक बातमी समोर आलीय. सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Big fall in gold price

1/10
सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसानंतर आज सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण झालीय.
2/10
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात तब्बल 550 रुपयांनी घसरण झालीय, तर दुसरीकडं चांदीच्या दरातही जवळपास 550 रुपयांची घसरण झालीय.
3/10
देशातील मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोने आणि चांदीचे दर घसरले आहे. यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी मिळाली आहे
4/10
MCX वर देखील सोन्याचा जूनचा वायदा आज 571 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 72156 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरांवर आला आहे.
5/10
दिल्लीत 24 कॅरेट सोने 130 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तिथे 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 73,380 रुपये आहे.
6/10
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
7/10
बंगळुरुमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
8/10
मुंबईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
9/10
हैदराबादमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
10/10
सूरतमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
Sponsored Links by Taboola