एका वर्षात होणार मालामाल! 'हे' पाच स्टॉक तुम्हाला देतील दमदार रिटर्न्स
ब्रोकरेज हाउस Systematix ने गुंतवणुकीसाठी चांगल्या स्थितीत असलेले काही स्टॉक्स सूचवले आहेत. यामध्ये Carysil, ACC, HDFC Bank, Home First Finance, Jupiter Wagons यांचा समावेश आहे. आगामी एका वर्षात हे शेअर्स 46 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSystematix या ब्रोकरेज हाऊसने Carysil या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1,147 रुपयांचे टार्गेट ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक भविष्यात 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
Systematix ब्रोकरेज फर्मने ACC या कंपनीचे स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीत गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 3,099 रुपयांचे टार्गेट ठेवण्यास सांगितले आहे. हा शेअर आगामी एका वर्षात 26 टक्क्यांनी वाढू शकतो.
HDFC Bank या स्टॉकमध्येही गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असा दावा Systematix ने केला आहे. त्यासाठी 1,860 रुपयांचे टार्गेट ठेवावे, असे या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे. भविष्यात हा स्टॉक 11 टक्क्यांनी वाढू शकतो.
Home First Finance हा स्टॉकही भविष्यात चांगला परतावा देऊ शकतो त्यासाठी 1300 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. हा शेअर एका वर्षात 11 टक्क्यांनी वाढू शकतो.
Systematix या ब्रोकरेज फर्मने Jupiter Wagons हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 728 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे, असे ब्रोकरेज फ्रर्मने सूचवले आहे. हा शेअर एका वर्षात 46 टक्क्यांनी परतावा देण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)