फक्त 'या' स्टॉक्समध्ये पैसे गुंतवा, मिळू शकतो दमदार परतावा!

सध्या शेअर बाजारात चढऊतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ब्रोकरेज फर्म्सने गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत.

best stock suggestion (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
Stock to BUY: मंगळवारी म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी भारतीय भांडवली बाजारात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. या पार्श्वभूीवर काही ब्रोकरेज फर्म्सने आगामी 4-10 दिवसांत चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता असणारे 5 शेअर्स सुचवले आहेत.
2/7
Sharekhan या ब्रोकरेज हाऊसने GSFC हा शेअर खरेदी करण्याचे सुचवले आहे. त्यासाठी 250.90 / 262 रुपयांचे टार्गेट आणि 233.90 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा तर 241.26 रुपयांवर हा शेअर खरेदी करावा असे या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. 1 ते 5 दिवसांच्या खरेदीसाठी या शेअरची शिफारस करण्यात आली आहे.
3/7
IIFL सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने RAYMOND या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट 2225 रुपये, स्टॉपलॉस 408 रुपये तर बाय रेंज 2140-2155 रुपये ठेवायला हवे. आगामी 10 दिवसांसाठी ही खरेदी करावी, असे आयआयएफएल सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
4/7
HDFC Securities ने आगामी चार दिवसांसाठी Mahindra Holidays & Resorts India Ltd या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट 448 रुपये, स्टॉपलॉस 2100 रुपये तर बाय रेंज 418.45-411 ठेवण्याचे सुचवले आहे.
5/7
HDFC Securities ने BIKAJI या शेअरमध्ये आगामी 10 दिवसांसाठी गुंतवणूक करावी, असे सुचवले आहे. त्यासाठी टार्गेट 922 रुपये, स्टॉपलॉस 824 रुपये तर बाय रेंज 867-841 ठेवायला हवी.
6/7
HDFC Securities ने RKFORGE या शेअरमध्ये आगामी 10 दिवसांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट 1030 रुपये, स्टॉपलॉस 933 रुपये तर बाय रेंज 976.20-945 रुपये ठेवण्याचे एचडीएफसी सिक्योरिटीजने सुचवले आहे.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola