वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं केळीच्या बागा उद्धवस्त
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या (Ujani Dam) परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
केळीच्या बागा (Banana crop) जमिनदोस्त झाल्या आहेत. यामुळं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
सध्या वादळी वारे आणि अवकाळीचा सर्वात जास्त फटका उजनी जलाशयाच्या काठावर असणाऱ्या केळी बागांना बसला आहे.
उजनी जलाशयाच्या काठावर असणाऱ्या चिखलठाण परिसरात खूप मोठे नुकसान झाले आहे. येथील विकास राजाराम वाघमोडे यांची चार एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे.
शेतकरी नवनाथ कोंडीबा मारकड यांची पाच एकर क्षेत्रावरी केळीची बाग आडवी झाली आहे.
प्रदीप विठ्ठल हिरवे यांची तीन एकर केळीची बागही आडवी झाली आहे. याशिवाय अभिजीत महादेव हिरवे यांची साडेतीन एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे.
राज्यात केळीचे हब होऊ पाहणाऱ्या करमाळा तालुक्याला मोठा फटका बसला असून अंदाजे 15 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
करमाळा तालुक्याला मोठा फटका, 15 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या (Ujani Dam) परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.