टॅरिफ वॉरचा आयफोन प्रेमींना धक्का, 1 लाखांचा फोन 3 लाखांवर जाणार, ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका बसणार?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम iPhone च्या किमती वाढण्यामध्ये होणार आहे.याचं कारण देखील समोर आलं आहे.
आयफोन महागणार?
1/5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं जगभर खळबळ उडाली आहे. चीन आणि अमेरिकेतील ट्रेड वॉरमुळं काही गोष्टींवर परिणाम झाले आहेत. आयफोनच्या किमती देखील वाढू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2/5
डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क धोरण लागू केलं आहे. या नव्या टॅरिफ धोरणामुळं अमेरिकेत नोकऱ्या आणि कारखाने परत येतील, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
3/5
वेडबश सिक्युरिटीजचे ग्लोबल टेक्नोलॉजीचे रिसर्च हेड डैन आइव्स यांनी धक्कादायक दावा केला आहे. जर आयफोनचं उत्पादन अमेरिकेत सुरु झालं तर एका आयफोनची किंमत साडे तीन हजार डॉलर म्हणजे जवळपास साडे तीन लाखांवर जाईल असा अंदाज वर्तवला.
4/5
अमेरिकेत उत्पादन खर्च वाढल्यानं iPhone च्या दरात वाढ होऊ शकते. आइव्सच्या मते आशियात असणारी मजबूत सप्लाय चैन अमेरिकेत निर्माण करण्यासाठी 30 अब्ज डॉलरचा खर्च येईल. केवळ 10 टक्के उत्पादन अमेरिकेत हलवण्यास तीन वर्ष लागतील.
5/5
सध्या आयफोनचे पार्ट तैवान, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये बनतात.ज्याचं 90 टक्के असेम्बलिंग चीनमध्ये होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं एप्पलच्या शेअरमध्ये 25 टक्के घसरण झाली आहे.
Published at : 09 Apr 2025 09:43 PM (IST)