Share Market : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरची दमदार कामगिरी, सहा महिन्यात शेअरमध्ये 50 टक्के तेजी

Reliance Power : रिलायन्स पॉवर, रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. रिलायन्स पॉवरचा शेअर चांगली कामगिरी करत आहे.

Continues below advertisement

रिलायन्स पॉवरची दमदार कामगिरी

Continues below advertisement
1/7
अनिल अंबानी यांच्या एडीएजी ग्रुपच्या कंपन्यांनी दमदार कामगिरी केली आहे. रिलायन्स पॉवर, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये एका दिवसात 19 टक्के तेजी पाहायला मिळाली.
2/7
शुक्रवारी 23 मे रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 19 टक्के तेजी दिसून आली असून स्टॉक 53 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी आली असून स्टॉकम 3.64 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 10.5 टक्क्यांनी वाढून 313 रुपयांवर पोहोचला आहे.
3/7
रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यावर अधिक कर्ज आणि कमजोर कामगिरी पाहायला मिळाली होती आता मात्र कंपनीनं बदलेली रणनीती, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील योजनांमुळं गुंतवणूकदारांना विश्वास मिळतोय.
4/7
रिलायन्स पॉवरच्या आता रिन्यूएबल एनर्जी मध्ये देखील कामकाज सुरु करण्याची शक्यता आहे. रिलायन्सची उपकंपनी एनयू सनटेकनं 25 वर्षांसाठी 930 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा आणि 1860 MWH बॅटरी स्टोरेजचा करार केला आहे. 10000 कोटींचा हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असेल.
5/7
एन एनर्जीजनं 350 मेगावॅट सौर ऊर्जा आणि 700 MWh स्टोरेज क्षमतेचा प्रकल्प देखील मिळवला आहे. ज्यामुळं कंपनी क्लीन एनर्जीमधील महत्त्वाचं पाऊल टाकतेय. भूतान सरकार सोबत देखील या कंपनीनं करार केला आहे. 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प असेल. हा प्रकल्प 2 हजार कोटींचा संयुक्त उद्योग आहे.
Continues below advertisement
6/7
रिलायन्स पॉवरनं मार्च तिमाहीत 126 कोटींचा नफा मिळवला आहे. 2023-24 च्या मार्च तिमाहीत कंपनीचा तोटा 397 कोटी रुपये होता. खर्चात कपात आणि फायनान्सिंग कॉस्ट घटल्यानं हे घडल्याची शक्यता आहे. मे महिन्यात रिलायन्स पॉवरनं 392 कोटी रुपयांचं भांडवल उभं केलं आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि बसेरा होम फायनान्सच्या वॉरट रुपांतरातून हे आलं आहे.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola