Stock Market : एका वर्षात पैसे दुप्पट, आता शेअरची विभागणी होणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा स्टॉक कोणता?

Stock Split :एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात घसरण होत असताना अमी ऑर्गेनिक लिमिटेडच्या शेअरची विभागणी होणार आहे. याबाबत कंपनीनं एक्सचेंजला माहिती दिली.

शेअर मार्केट

1/6
अमी ऑर्गेनिक लिमिटेड या शेअरची विभागणी होणार आहे. कंपनीच्या शेअरची विभागणी होणार असल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेली आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 1.74 टक्के घसरण झाली आहे. काल कंपनीचा शेअर 2242.15 रुपयांवर बंद झाला.
2/6
अमी ऑर्गेनिक लिमिटेडनं शेअर बाजाराला माहिती देत म्हटलं की 10 रुपयांची दर्शनी किंमत असलेल्या एका शेअरची 2 भागांमध्ये विभागणी केली जाणार आहे. शेअरचे दोन भाग झाल्यानंतर दर्शनी किंमत 2 रुपये होईल.
3/6
अमी ऑर्गेनिक लिमिटेडनं स्टॉक स्पिलच्या रेकॉर्ड डेटची तारीख जाहीर केलेली नाही. ही प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण केली जाणार आहे.
4/6
2022 पासून अमी ऑर्गेनिक लिमिटेडनं तीन वेळा लाभांश दिला होता. तीन वेळा कंपनीनं एका शेअरवर योग्य गुंतवणूकदारांना 3 रुपयांचा लाभांश दिला आहे.
5/6
गेल्या वर्षभरात अमी ऑर्गेनिक लिमिटेडनं चांगली कामगिरी केली आहे. वर्षभरात शेअरी किंमत 105 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यात अमी ऑर्गेनिक लिमिटेडमध्ये 70 टक्के तेजी आली आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2643.50 रुपये आहे. तर निचांक 1005.05 रुपये होता. कंपनीचं बाजारमूल्य 9178 कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 139 टक्के तेजी आली तर 3 वर्षात 152 टक्के वाढ झाली.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola