14 सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी! एक रुपयाही न देता आधार करता येईल अपडेट, जाणून घ्या सविस्तर!
सप्टेंबर महिन्यात अनेक वित्तीय नियम बदलले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकांना आपल्या आधार कार्डवर अनेक बदल करायचे असतात. त्यासाठी अनेकदा आधार केंद्रावर जावं लागतं.
पण UIDAI तर्फे मोफत आधार अपडेट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र लवकरच मोफत आधार अपडेटची मुदत संपुष्टात येणार आहे.
याआधी UIDAI ने जून महिन्यात मोफत आधार अपडेटची मुदत वाढवून दिली होती. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार आहे.
मुदत संपल्यानंतर तुम्हाला आधारमध्ये अपडेट करायची असेल तर शुल्क द्यावे लागेल. मोफत आधार अपडेट करायची सुविधा फक्त ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑफलाईन आधार अपडेट करायचे असेल तर त्यासाठी सेवा शुल्क द्यावे लागेल.
आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
आपला मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला लॉगइन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया फॉलो करून आधार अपडेट करता येईल.