24 carat gold rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर महागले, सोने-चांदीचे दर किती रुपयांवर पोहोचले?
gold rates : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली तर चांदीचे दर वाढले आहेत.
सोने दर अपडेट
1/5
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बदल दिसून आले. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 352 रुपयांची घसरण प्रतितोळा झाली. तर चांदीच्या एक किलोच्या दरात 467 रुपयांची वाढ झाली आहे.
2/5
बुलियन मार्केट मध्ये जीएसटीशिवाय सोन्याचे एका तोळ्याचे दर 113232 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर 134556 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 116628 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे द 138592 रुपयांवर पोहोचले आहेत.
3/5
सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात 10844 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर 16984 रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार 31 ऑगस्टला सोन्याचे दर 102388 रुपयांवर होते. तर, चांदीचे दर 117572 रुपयांवर होते.
4/5
23 कॅरेट सोन्याचे दर 350 रुपयांनी कमी होऊन 112779 रुपयांवर आले. 22 कॅरेट सोन्याचे दर 322 रुपयानी कमी होऊन 103721 रुपयांवर आले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 264 रुपयांनी कमी होऊन 84924 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 14 कॅरेट सोन्याच्या दरात 206 रुपयांची घसरण होऊन 66241 रुपयांवर पोहोचले आहेत.
5/5
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्यानं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणन गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असल्यानं मोठ्या प्रमाणावर सोन्याचे र वाढले आहेत. सोने दरात 2025 मध्ये मोठी वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 75740 रुपये होता. तर, चांदीचा एक किलोचा दर 86017 रुपये होता. त्यावरुन चांदीचे दर 134556 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, सोन्याचे दर 116628 रुपयांवर पोहोचले आहेत.
Published at : 25 Sep 2025 03:48 PM (IST)