नवरात्रीत गरबा का खेळतात? वाचा यामागचं महत्त्व

नवरात्रीच्या काळात सर्वत्र गरबा खेळला जातो. पण गरबा का खेळला जातो आणि त्यामागचा अर्थ काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

नवरात्रीत गरबा का खेळतात? वाचा यामागचं महत्त्व

1/7
नवरात्रीच्या काळात सगळीकडे गरबा खेळला जातो. पण गरबा का खेळतात? आणि त्यामागचा अर्थ काय आहेय़ हे जाणून घेणं गरजेचं आहे.
2/7
गरबा हे देवीच्या सन्मानार्थ केले जाणारे एक पवित्र नृत्य आहे. या दिवसांत भक्त आनंदाने एकत्र येऊन गरबा खेळतात आणि उत्सव साजरा करतात.
3/7
‘गरबा’ हा शब्द ‘गर्भा’ पासून आला आहे. ‘गर्भा’ म्हणजे गर्भ, जो सृष्टीच्या आधीच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो. गरब्यात मध्यभागी दिवा ठेवला जातो. हा दिवा देवीला अर्पण केलेल्या श्रद्धेचं प्रतीक आहे.
4/7
गरबा खेळताना लोक वर्तुळात फिरतात. हे वर्तुळ जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या अखंड चक्राचे दर्शन घडवते. जसे ग्रह सूर्याभोवती फिरतात, तसेच भक्त दिव्याभोवती नृत्य करतात.
5/7
गरबा हे उत्साहाचं नृत्य आहे. देवीचा जागर यामार्फत केला जातो. यात हात-पायांची लय ही भगवान शंकर आणि शक्तीच्या एकतेचे प्रतीक मानली जाते.
6/7
नवरात्रीत दररोज देवीच्या एका रुपाची पूजा करतात आणि गरबा खेळतात. त्यामुळे साधकाची अंतर्गत ऊर्जा जागृत होते आणि भक्तीभाव वाढतो.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola