Panchak 2025: पंचक काळात शुभ कार्यांना मनाई का असते? परिणाम जाणून व्हाल थक्क..
Panchak 2025:पंचक काळात, शुभ कार्ये करण्यास मनाई असते. या काळात प्रवास, बांधकाम आणि नवीन कार्यक्रम टाळणे फायदेशीर मानले जाते.
Continues below advertisement
Panchak 2025
Continues below advertisement
1/10
ज्योतीशास्त्रानुसार पंचक काळ अशुभ आणि घातक मानला जातो.
2/10
ही ती प्रक्रिया आहे ज्यात चंद्र कुंभ आणि मीन राशीतून जातो. या दरम्यान बहुतेक राशीवर त्यांचा अशुभ प्रभाव होतो.
3/10
पंचक काळ येतो, जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वभाद्रपद, उत्तरभाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांमधून जातो. या पाच नक्षत्रांमुळे याला "पंचक" म्हणतात.
4/10
हा काळ अंदाजे पाच दिवसांचा असतो आणि तो अशुभ मानला जातो. या काळात घर बांधणे, प्रवास करणे किंवा वस्तू गोळा करणे निषिद्ध आहे.
5/10
पंचक पाच भागात विभागले गेले आहेत. रोग पंचक, नृप पंचक, चोर पंचक, मृत्यु पंचक आणि अग्नि पंचक.
Continues below advertisement
6/10
रविवारी येणारा रोग पंचक आरोग्यासाठी हानिकारक आहे. सोमवारचा नृप पंचक सरकारी कामासाठी शुभ, पण वैयक्तिक कामासाठी अशुभ आहे. शुक्रवारच्या चोर पंचकमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. शनिवारचा मृत्यू पंचक त्रास घेऊन येतो आणि मंगळवारचा अग्निपंचक घरबांधणीसारख्या प्रकल्पांसाठी प्रतिकूल मानला जातो.
7/10
धनिष्ठा नक्षत्रात आगीचा धोका असतो, तर शतभिषामुळे भांडणे होण्याची शक्यता वाढते. पूर्वा भाद्रपद नक्षत्रामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात,उत्तरा भाद्रपदामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि रेवती नक्षत्रामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे, दक्षिणेकडे जाणे किंवा नवीन पलंग बनवणे टाळावे.
8/10
जर पंचक चालू असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत पीठ किंवा कुशाचे पाच पुतळे बनवून त्यांच सुद्धा अटीं संस्कार कर . असं जर नाही केला तर पंचक दोष लागण्याची शक्यता आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, हा दोष कुटुंबातील इतर पाच सदस्यांचा मृत्यू किंवा त्रास देऊ शकतो.
9/10
पंचक अशुभ मानलं जातं , पण काही नक्षत्र शुभ कार्यांसाठी अनुकूल असतात.उत्तरभाद्रपद नक्षत्र सर्वार्थ सिद्धि योग बनवते. धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्रांमध्ये प्रवास करणे किंवा यंत्रसामग्रीसह काम करणे शुभ असते, तर रेवती नक्षत्रात व्यवसाय, कपडे किंवा दागिने खरेदी करणे फायदेशीर असते.
10/10
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 28 Oct 2025 11:54 AM (IST)