Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ नवीन आठवड्यात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.

Weekly Horoscope 23 To 29 December 2024

1/12
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
2/12
नवीन आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांच्या तब्येतीत जरा बिघाड झालेला दिसेल. व्यावसायिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळतील. तसेच, या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांचं मत विचारात घेऊन करा. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. तसेच, नोकरीची स्थिती चांगली असेल त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
3/12
कुंभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात जास्त व्यस्त व्हाल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
4/12
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आत्मपरिक्षणाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जुन्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. तसेच, नवीन प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. तसेच, नवीन आठवड्यात तुमचा प्रवासाला जाण्याचा देखील चांगला योग आहे. त्यामुळे धार्मिक कार्यात मग्न व्हाल.
5/12
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा सकारात्मक असेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य दिसून येईल. आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन आठवड्यात तुमच्या अनेक लोकांशी गाठीभेटी होतील. या सगळ्यांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.
6/12
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या खर्चात वाढ होईल. मात्र, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या व्यवसायातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे आरोग्य एकदम ठणठणीत असेल.
7/12
तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. अभ्यासात तुमचं मन चांगलं रमेल. तसेच, नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.
8/12
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा आहे. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबियांबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता. या आठवड्यात कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. तसेच, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
9/12
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत सुरु राहील. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात वाद निर्माण होतील. पण, हे वाद फार मोठे नसतील. आठवड्याच्या शेवटी मात्र तुमची तब्येत बिघडू शकते. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि वेळेवर औषधपाणी घ्या.
10/12
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत राहील. तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फार चांगला सुरु आहे. तसेच, तुमच्या रोजगारात चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. आठवड्याच्या शेवटी कोणताच निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. अन्यथा तुमचंच नुकसान होऊ शकतं.
11/12
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ मध्यम फलदायी ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यात हळुहळू सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, या आठवड्यासाठी लाल रंग तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे.
12/12
नवीन आठवड्यात तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल. लोकांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. समाजात मान-सन्मान चांगला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
Sponsored Links by Taboola