Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काहींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 21 To 27 October 2024

1/12
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार रोमॅंटिक असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून कमिटमेंट हवी असेल तर त्यासाठी तुमच्या पार्टनरवर फोर्स करु नका. जे तरुण सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर मिळण्याची शक्यता आहे.
2/12
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. घाईगडबडीत निर्णय घेतल्यास तो चुकण्याची शक्यता आहे.
3/12
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक न राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. तसेच, छोट्या-छोट्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या दरम्यान तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
4/12
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे असतील तर ती पूर्ण होतील. तसेच, या आठवड्यात तुम्हाला शांत राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्यावर भर द्या. वैवाहिक जीवन सुखी राहील.
5/12
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तसेच, कामातही तुमचं मन चांगलं रमेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आठवड्याचा शेवट काहीसा खर्चिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
6/12
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्यल असणार आहे. या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम असाल. तसेच, कोणालाही पैसे देताना आधी 10 वेळा विचार करा. अन्यथा तुमचे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींचा तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल.
7/12
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा यशाचा असेल. या आठवड्यात तुम्ही काही नवीन कामात गुंतवणूक करू शकता. तुम्ही स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे, नवीन आठवड्यात खरेदीचे योग आहेत. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. या आठवड्यात तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
8/12
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सर्व तणावातून आराम मिळेल. तुमचे तुमच्या भावांसोबत चांगले संबंध राहतील. लग्नासाठी काही प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला या आठवड्यात चांगली बातमी मिळेल.
9/12
सुरू होणारा नवीन आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. तुमची सर्व स्वप्नं लवकरच पूर्ण होतील. तुम्ही वेळेचं महत्त्व ओळखलं पाहिजे. योग्य वेळी योग्य काम न केल्याने तुमचं नुकसान होईल. थोडा धीर धरा, सर्व काही ठीक होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.
10/12
मकर राशीच्या लोकांना नवीन लोक भेटू शकतात, नवीन ओळखी होऊ शकतात. या आठवड्यात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
11/12
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. या काळात तरुणांनी निष्काळजीपणाने वागू नये. वाहन जपून चालवा, अपघाताची शक्यता आहे. व्यावसायिकांनी आपला वेळ प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध दृढ करण्यात घालवावा. तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी.
12/12
नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या मिळतील. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल फार आनंदी व्हाल. प्रत्येक अद्भूत संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे राहा. या आठवड्यात तुम्ही एखादी मोठी खरेदी करू शकता. व्यवसायावर बारकाईने लक्ष ठेवा, तुमच्या पाठीमागे काही चूक होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.
Sponsored Links by Taboola