Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 10 To 16 November 2025 : हिंदू कॅलेंडरप्रमाणे, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. या आठवड्यात अनेक ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच अनेक शुभ योग जुळून येतायत.
Continues below advertisement
Weekly Horoscope 10 To 16 November 2025
Continues below advertisement
1/8
10 ते 16 नोव्हेंबर 2025 हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
2/8
तूळ राशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.
3/8
वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा भाग्यशाली ठरेल. या काळात तुमची जुनी कामं पूर्ण होतील. नवीन कामासाठी तुम्ही सुरुवात करु शकता. यात्रेला जाण्याचे शुभ योग आहेत.
4/8
धनु राशीसाठी नवीन आठवडा परिवर्तनकारी असणार आहे. या काळात तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांची कामात पदोन्नती झालेली दिसेल. तसेच, मानसिक शांती लाभेल.
5/8
मकर राशीसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा जबाबदाऱ्यांचा आणि शिस्तीचा असणार आहे. तुमचं करिअर घडवण्यासाठी तुम्ही फार मेहनत घ्याल. कुटुंबातील सदस्यांचा देखील तुम्हाला पाठिंबा मिळेल.
Continues below advertisement
6/8
कुंभ राशीसाठी हा आठवडा भाग्याचा ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन विचार आणि नेटवर्किंग स्किल्स लाभदायी ठरेल. पैशांच्या बाबतीत आर्थिक स्थिरता लाभेल. या काळात घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
7/8
मीन राशीसाठी नवीन आठवडा लाभदायी ठरणार आहे, काहीसे चढ-उतार येऊ शकतात. मात्र त्यातून तुम्ही मार्ग काढाल. पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Nov 2025 03:21 PM (IST)