Weekly Horoscope : नोव्हेंबरचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार 'गुडलक'; पैसा, प्रसिद्धी की नोकरी मिळणार? वाचा मेष ते कन्या राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 10 To 16 November 2025 : हिंदू कॅलेंडरप्रमाणे, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. या आठवड्यात अनेक ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच अनेक शुभ योग जुळून येतायत.
Continues below advertisement
Weekly Horoscope 10 To 16 November 2025
Continues below advertisement
1/8
10 ते 16 नोव्हेंबर 2025 हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
2/8
मेष राशीचा नवीन आठवडा नवीन ऊर्जा घेऊन येणारा असेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील.
3/8
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा संतुलनाचा तसेच सावधानता बाळगण्याचा असणार आहे. या काळात सहकाऱ्यांशी जास्त वादविवाद घालू नका. तसेच, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.
4/8
मिथुन राशीसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा कलात्मक स्वरुपाचा असणार आहे. या काळात तुमच्या नोकरी-व्यवसायात तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होतील. कलात्मकतेला वाव मिळेल.
5/8
नव्या आठवड्यात तुम्ही आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे. तुमच्या जवळची माणसंदेखील तुम्हाला धोका देऊ शकतात. तुमच्या विचारात स्पष्टता यायला हवी. योग, व्यायाम गरजेचं आहे.
Continues below advertisement
6/8
सिंह राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असेल. या काळात समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल.
7/8
कन्या राशीसाठी नवीन आठवडा मेहनतीचा असणार आहे. या दरम्यान पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च केल्यास आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगी भासू शकते.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Nov 2025 12:46 PM (IST)