Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; अनपेक्षित धनलाभ होणार, उत्पन्नाचे स्रोत वाढणार
Weekly Horoscope 10 June To 16 June : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Continues below advertisement
Weekly Lucky Zodiacs
Continues below advertisement
1/10
धनु रास (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्ही चांगली प्रगती कराल. तुमचा वेळ आणि शक्ती योग्य ठिकाणी गुंतवून तुम्हाला फायदा होईल.
2/10
सरकारकडून, सरकारी योजनेतून मदत मिळण्याची आशा आहे. जर तुम्ही कमिशनवर काम करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
3/10
मकर रास (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरेल.
4/10
तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आरोग्य आणि संबंध दोन्ही चांगले राहतील. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल.
5/10
कन्या रास (Virgo) : कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा तणावमुक्त असेल. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
Continues below advertisement
6/10
वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळू शकते. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही जोखीम घेऊ शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.
7/10
सिंह रास (Leo) : सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्यवान असेल, या आठवड्यात नशीब तुमची साथ देईल. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल, ऑफिसमधील लोक तुमच्या आदेशाचं पालन करतील.
8/10
जर तुमचा पैसा बराच काळ बाजारात अडकला असेल तर तुम्हाला तो परत मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या काही मोठ्या इच्छा पूर्ण होतील.
9/10
कर्क रास (Cancer) : कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शहाणे व्हा. करिअर आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल.
10/10
एखाद्याच्या मदतीने तुम्हाला काही योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. या आठवड्यात तुमचं आरोग्य उत्तम राहील. जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. जे लोक सत्तेत आहेत ते यश प्राप्त करतील.
Published at : 11 Jun 2024 10:56 AM (IST)