Vitthal Mandir : तब्बल 79 दिवसांनंतर विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनास सुरुवात; विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी
आज तब्बल 79 दिवसानंतर विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनास सुरुवात झाल्याने आषाढी एकादशीप्रमाणेच पंढरपुरात गर्दी दिसून आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवाचं देखणं रूप पाहण्यासाठी काल रात्री 8 वाजल्यापासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
तासन् तास या ठिकाणी उभे राहून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले होते.
आज सकाळी साधारण 6 वाजल्या पासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली.
या दरम्यान भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. तसेच, लहान मुलांसग अबाल वृद्ध देखील या रांगेत उभे होते.
या ठिकाणी जमलेली गर्दी पाहून तर जणू या भाविकांना देवाकडे भरपूर काहीतरी मागायचं आहे, साकडं घालायचं आहे हेच जाणवत होतं.
या ठिकाणी जमलेल्या भाविकांना पावसाचे साकडे घालायचे होते, भीषण पाणीटंचाई दूर व्हावी तसेच महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हाला असं साकडं घालायचं होतं.
शेतकऱ्यांवरील सुकाळ येऊ दे आणि राजकारण्यांवर दुष्काळ येऊ दे अशीही मागणी देवाकडे मागणार असल्याचे एका भाविकाने सांगितले.
बऱ्याच दिवसांनंतर देवाचं दर्शन झाल्याने भाविकांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव होता.