Vastu Tips : एकवेळ पैसे द्या पण चुकूनही कोणाकडून 'या' 5 गोष्टी फुकटात घेऊ नका; घरात येईल दारिद्र्य

Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार, काही वस्तू फ्री मध्ये घेतल्याने आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.

Vastu Tips

1/8
अनेकदा आपल्याला आपले नातेवाईक, मित्रमंडळी भेटवस्तू देतात. तर, काही वेळेला आपण इतरांकडून काही वस्तू मागतो. जर तुम्ही सुद्धा खालीलपैकी एखादी वस्तू फ्री मध्ये घेत असाल तर वेळीच थांबा. वास्तू शास्त्रानुसार, काही वस्तू फ्री मध्ये घेतल्याने आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.
2/8
वास्तू शास्त्रानुसार, कधीही कोणाकडूनही फ्री मध्ये रुमाल किंवा भेट म्हणून कोणाला लोणचं देऊ नका. यामुळे तुमचे एकमेकांबरोबरचे संबंध खराब होऊ शकतात.
3/8
तसेच, कधीच कोणाकडून मोफत मीठ घेऊ नका. यामुळे कर्ज वाढण्याची शक्यता असते तसेच, आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
4/8
मिठाप्रमाणेच कधीच कोणाकडून तेलही फुकट घेऊ नये. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान गोऊ शकतं.
5/8
इतर वस्तूंप्रमाणेच कधीच कोणाकडून मोफत माचिसदेखील घेऊ नका. यामुळे तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं.
6/8
इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू कोणाकडून भेट म्हणून घेऊ नका. यामुळे राहु ग्रह तुम्हाला इच्छित फळ देणार नाही.
7/8
एखाद्याला पर्स गिफ्ट म्हणून दिल्याने तुमच्यावर आर्थिक संकट ओढावू शकतं. पर्स आपल्या आर्थिक स्थितीचं प्रतिनिधीत्व करते. त्यामुळे आपल्याकडे जी धनसंपत्ती येत असते ती कोणाला पर्स भेट म्हणून दिल्याने त्या व्यक्तीकडे जाते.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola