Vastu Tips : एकवेळ उपाशी राहा पण कोणालाही 'या' गोष्टी उधारी देऊ नका; एकामागोमाग येतील संकटं

Vastu Tips : वास्तू शास्त्रात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात कोणालाही उधार देऊ नये अशा गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे.

Vastu Tips

1/7
एकमेकांबरोबर शेअर करणे किंवा वेळ आल्यावर पुन्हा मागणे ही चांगली सवय असू शकते. पण, कधी कधी तुमच्यासाठी हे एक संकट ठरु शकते. कारण, वास्तू शास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या चुकूनही कोणाला उधार देऊ नयेत.
2/7
वास्तू शास्त्रानुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला दिल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि वास्तू दोष लागतो. त्याचबरोबर काही गोष्टी उधार मागितल्याने आर्थिक समस्या, आजारपण आणि दुर्भाग्याचं कारण ठरु शकतं. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात.
3/7
कपड्यांची अदलाबदल कधीच करु नये. कारण कपड्यात सर्वात जास्त नकारात्मकता असते. जर तुम्ही कोणाचे कपडे घातले तर तुमच्यात देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणाला कपडे उधार देऊ नका.
4/7
तसेच, कोणाची अंगठी मागून कधीच हातात घालू नका. ती अंगठी कोणत्याही धातूची किंवा रत्नाची असो. असे केल्याने ग्रह-दोष निर्माण होतात.
5/7
असं म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीचं नशीब त्याच्या घड्याळाशी संबंधित असते. घड्याळ केवळ वेळच नाही तर व्यक्तीचा चांगला-वाईट काळही दाखवते. त्यामुळेच कधीच कोणाचं घड्याळ हातात घालू नये.
6/7
धार्मिक मान्यतेनुसार, शनीचा वास पायांत असतो. त्यामुळे जर तुम्ही कोणाची चप्पल पायात घातली तर दारिद्र्य वाढू शकते. त्यामुळेच कोणाचीही चप्पल पायात घालू नये.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola