Vastu Tips : जुन्या कपड्यांनी लादी पुसणं पडेल महागात; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...
बरेच जण कपडे जुने झाले की ते लादी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला वापरतात. परंतु या सवयीमुळे वास्तू दोष निर्माण होतो हे अनेकांना ठाऊक नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरातील प्रत्येक गोष्ट वापरण्यामागे वास्तूशास्त्राचे काही नियम आहेत. जुन्या कपड्यांचा वापर लादी पुसायला केल्याने घरात नकारात्मकता नांदते. घरातील व्यक्तींच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होतो.
घरामध्ये बऱ्याच स्त्रिया घर साफ करताना जुने कपडे वापरतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार, स्वतः वापरलेले कपडे कधीही सफाईसाठी वापरू नये.
घर सफाई करताना जुने किंवा फाटके कपडे वापरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नांदते. घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्री वास करते.
लहान मुलांचे कपडे साफसफाईसाठी वापरल्यास त्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असं करणं देखील टाळावं.
धार्मिक मान्यतेनुसार, जुन्या कपड्यांनी लादी पुसल्याने घरातील सुख-शांती निघून जाते आणि सतत क्लेश निर्माण होतात. घरात काही ना काही समस्या कायम राहतात, त्यामुळे फरशी पुसायला जुने कपडे वापरू नये.
काहीजण फरशी पुसण्यासाठी फाटलेल्या, जुन्या झालेल्या अंतर्वस्त्रांचा वापर करतात, परंतु असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. उत्साह आणि आनंद नाहीसा होतो. आळशीपणा, कामाचा वेग मंदावतो.
फाटक्या किंवा जुन्या कपड्यांनी लादी पुसल्याने घरी आलेली लक्ष्मी दारातून माघारी परतते. पैसा येण्याचा मार्ग अडला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, लादी पुसण्यासाठी योग्य कापडाचा किंवा मॉपचा वापर करावा. जुन्या कपड्यांनी लादी पुसू नये.
जुने झालेले कपडे हे दान करावे. दान करण्याआधी ते एकदा मीठाच्या पाण्यातून धुवून घ्यावे.