Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा

Vastu Tips : चपला, बूट हे नेहमी वास्तू शास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसारच ठेवावे. अन्यथा चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. घरात अस्ताव्यस्त चपला ठेवल्याने घरातून पैसा जातो.

Continues below advertisement

Vastu Tips For Shoes

Continues below advertisement
1/10
घरात येताच तुम्ही चप्पल काढून इथे-तिथे ठेवत असाल तर आताच सावध व्हा. वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आलं आहे, ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे चपला.
2/10
चपला, बूटं चुकीच्या जागी काढून ठेवली तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
3/10
वास्तुशास्त्रानुसार, घरात येताच चपला योग्य दिशेला ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो. वास्तूशास्त्रात चपला-बूटं ठेवण्याच्या योग्य दिशा सांगण्यात आल्या आहेत.
4/10
वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होतो. आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, आजार तुमची पाठ सोडत नाहीत. काही ना काही समस्या घरात कायम राहतात, त्यामुळे घरात चपला योग्य दिशेला काढून ठेवणं गरजेचं आहे.
5/10
शूज आणि चप्पल कधीही उलटी ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. त्यामुळे घरी आलेली लक्ष्मी दारातून माघारी परतते. पैसा येण्याचा मार्ग अडला जातो.
Continues below advertisement
6/10
वास्तूनुसार शूज किंवा चप्पल घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नये, ही देवी लक्ष्मीची दिशा आहे आणि या दिशेला चप्पल ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.
7/10
वास्तूनुसार घरात शूज आणि चपला नेहमी कपाटात किंवा शू रॅकमध्ये ठेवाव्या. हा शू रॅक दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा. शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा योग्य मानली जाते.
8/10
शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नये, त्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढतो. पती-पत्नीच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतो.
9/10
वास्तुशास्त्रानुसार, अग्नी आणि अन्न या दोन्ही गोष्टी पूजनीय मानल्या जातात, पण आजकाल लोक स्वयंपाकघरातही शूज आणि चप्पल वापरायला लागले आहेत, जे वास्तूनुसार चुकीचं आहे.
10/10
शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात ठेवणं अशुभ मानलं जातं, यामुळे घरात गरिबी येते.
Sponsored Links by Taboola