Vastu Tips : काय सांगता? जेवणासाठी पोळ्या मोजून बनवताय? जरा थांबा...पोळीशी संबंधित 'हे' 5 वास्तू नियम जाणून घ्या
तू किती पोळी खाणार आहेस? तुमच्यासाठी किती पोळ्या बनवू? अनेक घरात पोळीविषयी असे प्रश्न आपण ऐकलेच असतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोळीला मोजून बनविण्यामागे हे एक कारण आहे की यामुळे त्या खराब होत नाहीत. पण, वास्तूशास्त्रानुसार पोळ्या मोजून बनविणे योग्य मानले जात नाही.
वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल तर यामुळे घरात आर्थिक तंगी येऊ शकते.
असं म्हणतात की, पोळी बनविणं सूर्य, मंगळ, राहू ग्रह आणि ज्योतिषाशी संबंधित आहे. पोळ्या मोजून केल्याने सूर्य आणि मंगळ ग्रह कमजोर होतात. तर, राहुचा नकारात्मक प्रभाव पडतो.
तसेच, पोळीशी किचनच्या दिशेचाही संबंध असतो. वास्तूशास्त्रानुसार, तुमचं स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व स्थानी असावं. तसेच, पोळी बनवताना तुमचा चेहरा पू्र्व दिशेला असावा. तसेच, कधीही दक्षिण दिशेला गॅस किंवा चूल ठेवू नका. ज्योतिषशास्त्रानुसार, असे शुभ मानले जात नाही.
पोळीशी संबंधित एक नियम असाही आहे की, पोळी बनविताना पहिली पोळी नेहमी गायीसाठी बनवून ठेवा. गाईला पोळी दिल्याने तुमच्या हातून चांगली सत्कर्म घडतात. त्याचबरोबर तुमचे ग्रह देखील मजबूत होतात.
हिंदू धर्मानुसार, प्राणी-पशु, पक्ष्यांना देखील विशेष महत्त्व आहे. म्हणूनच गायीबरोबरच श्वानासाठीदेखील पोळी बाजूला काढून ठेवा.
श्वानाला पोळी दिल्याने तुम्हाला पुण्य मिळतं. तसेच, यामुळे राहु, केतु आणि शनी ग्रह देखील शांत होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)