Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार 'ही' आहे पाण्याचा माठ ठेवण्याची योग्य दिशा
Vastu Tips : उन्हाळा सुरु होताच थंड पाण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी मातीचा माठ आणतात. मात्र, हा माठ चुकीच्या दिशेला ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
Vastu Tips
1/7
उन्हाळ्याची सुरुवात होताच थंड पाणी पिण्यासाठी लोक घरी मातीचा माठ (मडकं) आणतात. मातीच्या मडक्यातील हे थंड पाणी फक्त आपला घशालाच शांत करत नाही तर आरोग्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होतो.
2/7
शास्त्रानुसार, ज्या घरात मातीचा माठ असतो. त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते. पण, जर हा माठ चुकीच्या दिशेला असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे वास्तूनुसार, माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊयात.
3/7
वास्तूशास्त्रानुसार, मातीचा माठ भरण्यासाठी उत्तर-पूर्व किंवा उत्तर दिशा चांगली मानली जाते. याचं कारण म्हणजे याची दिशा जलचे देवता वरुण देवाची आहे.
4/7
त्याचबरोबर उत्तर-पूर्व किंवा उत्तर दिशेला माठ ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते.आणि घरात सुख-समृद्धी निर्माण होते. वास्तूशास्त्रानुसार, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
5/7
वास्तूशास्त्रानुसार, घरात मातीचा माठ कधीच रिकामा ठेवू नये. असं करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे माठात नेहमी पाणी भरुन ठेवा. पाण्याचा माठ रिकामा ठेवल्यास घरात दारिद्र्य येते.
6/7
त्याचबरोबर, पाण्याचा माठ नेहमी स्वच्छ राहील या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. तसेच, अशुद्ध ठिकाणी जसे की, शौचालयाच्या जागी, बूटांच्या जागी पाण्याचा माठ ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Apr 2025 10:00 AM (IST)