Vastu Tips : घरात 'या' 4 वस्तू ठेवा; आर्थिक चणचण होईल दूर, घरात नांदेल सुख-शांती
वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्हाला धन-संपत्तीशी संबंधित काही अडचणी असतील तर तुम्ही त्यापासून सुटका व्हावी यासाठी देवी लक्ष्मीचा फोटो लावू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तूशास्त्रानुसार, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक संकट दूर होते. तसेच, त्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. यामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते जाणून घेऊयात.
घरात श्री गणेशाचा फोटो ठेवणं फार शुभदायक असतं. वास्तूशास्त्रानुसार, विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच, वास्तूदोषापासूनही मुक्ती मिळते.
वास्तूशास्त्रानुसार, घरात नारळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरात नारळ ठेवणं फार शुभदायक मानलं जातं.
असं म्हणतात की, घरात नारळ ठेवल्याने सुख-समृद्धीत वाढ होते. तसेच जीवनात आनंद टिकून राहतो.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या देव्हाऱ्यात शंख ठेवणं फारच शुभदायक मानले जाते. शंख ठेवल्याने घरात एक प्रकारे सकारात्मकता येते.
तसेच, घरात शंख ठेवल्याने वास्तूदोषापासून मुक्ती होते. आणि आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडतात.
मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीचा फोटो घरात लावल्याने आलेलं संकट दूर होते तसेच, पैशांचीही कमतरता भासत नाही.