Vastu Tips : दिवाळीआधीच घराच्या 'या' दिशेला ठेवा शंख; पैशांची आवक वाढेल, देवी लक्ष्मीची राहील कृपा
त्यामुळे म्हणतात की, ज्या घराच्या दिशेला शंखाची पूजा केली जाते तेव्हा देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. यासाठीच घराच्या कोणत्या दिशेला शंख तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरात शंख ठेवल्याने सकारात्मकता आणि समृद्धी राहते. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळते. तसेच, तुमच्या घरात पैशांची आवक वाढते. पण, हे सगळे फायदे मिळवण्यासाठी शंख ठेवण्याच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
शंखाला घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. शंखाला पूजा घरात ठेवणं फार शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शंख ठेवावा. याव्यतिरिक्त शंखाला उत्तर-पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही ठेवू शकता.या दिशेला शंख ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
कधीही कारण नसताना शंख वाजवू नका. जर तुम्हाला हा अभ्यास करायचा असेल तर पूजेच्या आधी आणि पूजेच्या नंतर शंख वाजवण्याचा अभ्यास करा. विनाकारण शंख वाजवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. घरात नकारात्मकता वाढते.
पूजा झाल्यानंतर शंखाला लाल किंवा पिवळ्या कपड्यात झाकून ठेवा. जेणेकरुन त्याला धूळ माती लागणार नाही. जर तुम्ही शंख वाजवणार असाल तर त्यानंतर तो नीट स्वच्छ करा.
धनप्राप्तीसाठी पूजा झाल्यानंतर शंखात गंगाजल भरुन संपूर्ण घरभर शिंपडा. या दरम्यान देवीकडे प्रार्थना करा. यामुळे तुमच्या घरात लवकरच धन संपत्तीची आवक वाढले. गरीबी दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)