Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : झोपताना 'या' चुका अजिबात करु नका; आयुष्यभरासाठी व्हाल कंगाल, हाती येईल दारिद्र्य
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार, आपल्यापैकी अनेकजण झोपताना काही सामान्य चुका करतात. यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी झोपताना कोणत्या चुका करु नयेत ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तूशास्त्रात व्यक्तीच्या झोपण्यामागे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचं पालन केल्याने तुमचं नशीब बदलू शकतं.
वास्तूशास्त्रानुसार, झोपताना तुमच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं तेल ठेवू नका. यामुळे तुम्हाला कधीही यश येणार नाही.
झोपताना आजूबाजूला कोणत्याच प्रकारची औषधं ठेवू नका. यामुळे घरातील कोणी ना कोणी व्यक्ती सतत आजारी पडू शकते.
झोपताना कधीही तुमच्या बाजूला पर्स किंवा पाकीट ठेवू नका. यामुळे घरात दारिद्र्य येते.
आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना बिछान्याजवळ पाणी ठेण्याची सवय आहे. असं केल्यास नकारात्मक शक्तींचा नेहमी तुमच्या आजूबाजूला वास असेल.
शेवटचा नियम म्हणजे, कधीही तुमच्या बिछान्याजवळ कोणत्याच प्रकारची चपला-बूटं काढून ठेवू नका. यामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)