Vastu Tips : सूर्यास्तानंतर 'या' 7 गोष्टी करणं टाळा; देवी लक्ष्मी होईल नाराज, तिजोरीतून पाहण्यासारखा वाहत जाईल पैसा
हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. कारण याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक संकटांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करु नयेत ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू काढू नये. मान्यतेनुसार, यामुळे धन-संपत्तीचा नाश होतो.झाडूला देवी लक्ष्मीशी जोडण्यात आलं आहे.
सूर्यास्तानंतर अंधाराच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करु नये. संध्याकाळच्या वेळी देवी-दैवतांचं आगमन होते. जर दरवाजा बंद केला तर लक्ष्मी नाराज होते.
तसेच, संध्याकाळच्या वेळी कोणत्याही व्यक्तीने झोपू नये. संध्याकाळच्या वेळी झोपल्यास घरात नकारात्मकता येते. यामुळे घराची प्रगती देखील होत नाही.
संध्याकाळच्या वेळी तुळशीची पानेही तोडू नयेत. तुम्ही असं केल्यास तुम्हाला दोष लागू शकतो. आणि देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
एक गोष्ट लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळी चुकूनही कोणाला दही, मीठ, हळद आणि धन दान करु नका. असं करण अशुभ मानलं जातं.
संध्याकाळच्या वेळी कपडे धुवणं किंवा साफ करणं फार अशुभ मानलं जातं. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
अनेकांना संध्याकाळच्या वेळी नखं कापणे, केस कापण्याची सवय असते. पण, वास्तूनुसार, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)