Vastu Tips : दिवाळी शॉपिंगमध्ये चुकूनही खरेदी करू नका 'ही' वस्तू; लक्ष्मी होईल नाराज, गरिबी येईल चालून
यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर देखील लोक अनेक चांगल्या वस्तू खरेदी करतात. परंतु, दिवाळी खरेदी दरम्यान काही वस्तू खरेदी करणं टाळलं पाहिजे, अन्यथा घरातील लक्ष्मी पळून जाते. या वस्तू नेमक्या कोणत्या? पाहूया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनत्रयोदशी-दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी सुख-समृद्धी आणणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात. जसे- सोने, चांदी, कपडे, भांडी, नवीन घर, कार, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. परंतु या काळात घरामध्ये नकारात्मकता वाढेल अशी कोणतीही अशुभ वस्तू खरेदी करू नये, हे लक्षात ठेवा.
काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. विशेषत: धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या किंवा गडद रंगाच्या वस्तू खरेदी करू नका, देवी लक्ष्मी रागावेल.
दिवाळीच्या काळात घरात जुन्या वापरलेल्या वस्तू आणू नका. या दिवसांत घरात फक्त नवीन वस्तू आणा, अन्यथा घराची बरकत होणार नाही.
दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी घरी चाकू, कात्री किंवा कोणत्याही धारदार हत्यारासारख्या वस्तू आणू नका. नाहीतर वर्षभर घरात भांडणं होतील. नात्यात मतभेद निर्माण होतील.