Vastu Tips : ओले केस, मळके कपडे आणि बरंच काही...आंघोळीनंतर तुमच्या 'या' सवयी टाळा; सूर्य, राहू आणि मंगळ ग्रहाचा होऊ शकतो वाईट परिणाम

Vastu Tips : अनेकदा आंघोळ केल्यानंतर आपल्या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे ग्रह नाराज होऊ शकतात. त्यामुळे या सवयी आत्ताच टाळा.

Continues below advertisement

Vastu Tips

Continues below advertisement
1/7
शास्त्रानुसार, आंघोळ केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं असं म्हणतात. मात्र, आंघोळीनंतर काही गोष्टी करु नयेत असं म्हटलं जातं. कारण आंघोळीनंतर जर तुम्ही या गोष्टी केल्या तर सूर्य, चंद्र आणि राहूसारख्या ग्रहांचा अशुभ प्रभाव राहतो.
2/7
अनेकदा लोक आंघोळ केल्यानंतर सरळ झोपतात. पण, आरोग्याच्या दृष्टीनेही तुमची ही सवय चांगली नाही. वास्तूशास्त्रानुसार, आंघोळीनुतर सरळ झोपल्यास सूर्याचा तेजस्वीपणा कमी होतो. आणि सूर्याचा प्रभाव कमी असल्याने आळस आणि थकवा जाणवतो.
3/7
आंघोळीनंतर बाथरुम स्वच्छ राहील या गोष्टीची विशेष काळजी घ्या. कारण जर का तिथे तुमचं आंघोळीचं पाणी, मळलेले कपडे जर असेच पडले तर तुमच्या या कामामुळे राहू-केतू ग्रह नाराज होतात. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, राहू-केतूच्या अशुभ प्रभावाने अनेक संकटं येतात.
4/7
अनेकदा आंघोळीनंतर बाथरुममध्ये केस गळतात, पडतात, तुटतात आणि तिथेच राहतात. पण, तुटलेल्या केसांना बाथरुममध्ये असेच सोडून देणं ही चांगली सवय नाही. यामुळे शनि आणि मंगळ ग्रहांचा अशुभ प्रभाव राहतो.
5/7
अनेक लोक बाथरुममध्ये देखील चपला वापरतात. पण, वास्तूशास्त्रानुसार, कधीही पायात चपला घालून आंघोळ करु नये. यामुळे राहू-केतू ग्रहाच्या वाईट दृष्टीचा सामना करावा लागू शकतो.
Continues below advertisement
6/7
महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच कपाळावर कुंकू देखील लावणं चुकीचं आहे. यामुळे नवऱ्याचं आयुष्य कमी होतात अशी मान्यता आहे. खरंतर, आंघोळीनंतर केस ओले असतात आणि केसांतून पाणी देखील गळत असतं. अशा वेळी कपाळावर कुंकू लावल्याने तो पुसला जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच, केस धुतल्यानंतर ते चांगले कोरडे करावेत आणि मग कपाळावर कुंकू लावावा.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola